खटेश्वर जवळ ओव्हरटेक च्या नादात दुचाकीची एसटीला भीषण धडक
जोडमोहा यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावरील खटेश्वर जवळ राठोड मंगलम, जवळ येरद वरून जोडमाकडे येत असलेली दुचाकी क्रमांक MH-29-CA-8296 TVS रायडर, ह्या गाडीने ओव्हरटेक करीत असताना, व राजुरा वरून यवतमाळ कडे जात असलेली एसटी बस क्रमांक MH-31-FC-3695 बस ला भीषण धडक बसल्याने दुचाकी सार दीपक तानबा मसराम वय 22 राहणार यरद ह्याला बसने पुढील चक्क्यामध्ये, 50 फूट फरफडत नेले, त्याला त्वरित यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले ही घटना 1 जून सायंकाळी आठच्या सुमारास घडली, या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस यांना कळविण्यात आली यवतमाळ ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश घोसे, सहायक फौजदार, जोडमोहा बीड जमादार सचिन तंबाके पुढील तपास करीत आहे, दीपक तानबा मसराम हे गंभीरित्या जखमी झाले आहे.
Add Comment