Breaking News यवतमाळ

जोडमोहा जवळ दुचाकीची ट्रक ला भीषण धडकेत एक ठार दोन जखमी

जोडमोहा जवळ दुचाकीची ट्रक ला भीषण धडकेत एक ठार दोन जखमी

जोडमोहा यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावरील, जोडमोहा जवळील करण धाब्याजवळ नांझा रोडवर पोटगव्हाण वरून जोडमाकडे येत असलेली दुचाकी क्रमांक MH-29-S-4459 स्प्लेंडर हिरो होंडा व यवतमाळ वरून देवनाळा कडे जात असलेला ट्रक क्रमांक MH-29-BE-5999 अशोक लेलँड, नांझा रोडवरील टर्निंग वर समोरासमोर धडकेत दुचाकी वरील राजू उर्फ राजेंद्र वसंतराव वडारकर वय 45 वर्ष राहणार पोटगव्हाण तालुका कळंब, याला तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात नेत असताना तळेगाव जवळ वाटेतच मृत्यू झाला तर दुसरा दत्ता लोणसावळे वय 50 राहणार देवनळा पोड तालुका कळंब हा जखमी झाले त्याला तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. हा अपघात दिनांक 1 जून दुपारी बाराचा सुमारास घडला याची माहिती मिळतात जोडमोहा पोलीस पाटील सुमनताई राजूरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले, पुढील तपास यवतमाळ ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेश घोसे, सहाय्यक फौजदार, जोडमोहा बीड जमादार सचिन तंबाके पुढील तपास करीत आहे. राजू उर्फ राजेंद्र वसंतराव वडारकर यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे दोन-तीन दिवसा अगोदर त्याची आई एस टी बस ने प्रवास करीत असताना कमरेत लचक भरली होती त्यामुळे तो पोटगव्हाण वरून यवतमाळ कडे औषधी आणण्यास जात होता अचानक, काळाचा घात झाला

Copyright ©