एस एस सी परीक्षेत आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची उंच् भरारी
शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हिवरी
ता.जि.यवतमाळ येथील विद्यार्थ्याची एच.एस.सी.व एस.एस.सी.परीक्षेच्या निकालामध्ये उंच भरारी घेतली असून हिवरीचे नाव पुनः शिखरावर
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत सुरु असलेल्या शासकिय माध्य व उच्च माध्य आश्रम शाळा हिवरी येथील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले असुन या आश्रम शाळेच्या विद्यार्थीनी चिचघाट केंद्रावरून पहिल्या पाच म्हधुन तिन विद्यार्थयाने आपल्या बुध्दिमतेची चमक दाखविली आहे
शासकिय माध्य व उच्च माध्य आश्रम शाळा हीवरी येथील विद्यार्थीनी कु.आयशा मुश्ताक अली हिने 500 पैकी 479 गुण प्राप्त करून चिचघाट केंद्रावरून प्रथम क्रमांक पटकविला तसेच तिच्या गुणांची ट्केवारी 95.80 आहे आणी कु.जारनुर जमीरबेग मिर्झा हिने 500 पैकी 437 गुण प्राप्त करून केंद्रावरून चौथा क्रमांक प्राप्त केला असुन गुणांची ट्केवारी 87.40आहे व कु.चैताली जितेश डाहाणे हिने 500 पैकी 429 गुण मिळवित केंद्रावरून पांचवा क्रमांक प्राप्त केला असुन गुणांची ट्केवारी अनुक्रमे 85.80आहे
शासकिय माध्य व उच्च माध्य आश्रम शाळा हिवरी येथील 57 विद्यार्थयानी एस. एस. सी. मार्च 2024 परीक्षा दिलेली असुन त्यापैकी 20 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 37 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले असुन शाळेचा निकाल शतप्रतिशत लागलेला आहे त्याच प्रमाणे एच.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये कला व विज्ञान मिळुन 73 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 5 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत व 38 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत विद्यालयाचा इयत्ता 12 वी चा निकाल सुद्धा शतप्रतिशत लागलेला आहे
शाळेचे प्राचार्य .के.ए.वावरे व शिक्षकवृद तथा शिक्षकेतर कर्मचारी यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन करीत आहे
Add Comment