यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कारची सलग ११ व्या वर्षी १०० टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

सुसंस्कारची सलग ११ व्या वर्षी १०० टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुसंस्कार विद्या मंदिर या इग्रंजी माध्यमाच्या शाळेने सलग अकराव्या वर्षीसुद्धा आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत शाळेचा १०० टक्के निकाल देत, शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. कु.कृष्णाई अरविंद पिसे ह्या विद्यार्थिनींनी ९६.२०% गुण प्राप्त करून शाळेमधुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु.क्रिष्णा विजय चोरे हिने ९५.६०% गुण प्राप्त करून द्वितीय तर कु.श्रुती अतुल पेटकर हिने ९३.६०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच मानसी प्रशांत धनरे ९३%, दर्शिका सचिन मिरासे ९२.८०%, श्रुती आनंद मेहेरे ९२.२०%,क्षितिज मनोज डेहनकर ९१.२०% , तृप्ती विशाल कोमावार ९०.६०%, अन्वेषा नितीन चांदेकर ८९.६०%, श्रावणी प्रदीप चंद्रे ८९.००%, कृष्णा अरविंद मोरे ८६.६०%,आर्या नितेश बेंद्रे ८६.२०%, मृणाली राजीव मार्कंड ८५.६०%, अदिती आनंद रानडे ८५.००%, ख़ुशी सुनील ओसवाल ८४.८०%, आर्यन सतीश राजपूत ८४.००%, मेघा सचिन गतफने ८३.८०%, अभिषेख संजय बखाल ८३.६०%, अवनी अभय मारोतकार ८३.२०%, सोहम प्रशांत निकम ८१.६०%, सोहम अजय दहिवलकर ८१.००%, सार्थक प्रशांत निकम ८०.२०%, पूर्वा मिलिंद देशमुख ७९.८०%, अद्वैत गजानन रुडे ७७.८०%, संस्कार रामदास राऊत ७६.२०%, या विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणी मध्ये घवघवीत यश संपादन केले. त्याबरोबरच मंदार रंगराव बोरकर, अंश राजेश शिंदे, पृथ्वीराज संजय शिराळ,वेदांत प्रवीण शिरभाते, शिवा मनोज जयस्वाल,गार्गी नितीन पखाले,परिणीती जयंत वाठोडकर, गायत्री नितीन पखाले, शिवम धीरज शुक्ला व गौरी कैलाश खापणे या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय श्रेणीत यश संपादित करून शाळेची सलग ११ वर्षांपासूनची १००% टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे. शाळेने सलग अकराव्या वर्षांपासूनची १०० टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम ठेवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा,उपाध्यक्ष सुनिलजी गुगलीया,सचिव संजय कोचे संस्थेचे सदस्य प्रवीण लुणावत,मनोज लुणावत गणेश गुप्ता, राजेश गुप्ता तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी भरभरून कौतुक केले आहे. शाळेला एका विशिष्ट उंचीवर नेल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत उज्ज्वल यशाबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुसंस्कार विद्या मंदिराच्या उत्तुंग अशा यशाबाबत सर्व स्तरावरून शाळेचे कौतुक होत आहे.

Copyright ©