यवतमाळ सामाजिक

शासकीय रुग्णालयातील समस्येबाबत शिष्टमंडळाने घेतली महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची भेट 

शासकीय रुग्णालयातील समस्येबाबत शिष्टमंडळाने घेतली महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची भेट 

एक तासाच्या चर्चेनंतर समस्या निवारण करण्याचे आश्वासन

यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात विविध विभागामधील समस्येबाबत रुग्णांच्या व नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आल्या, या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 21 मे रोजी विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता गिरीष जतकर,अधिक्षक सुरेंद्र भुयार यांचे सह विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.यांच्यासोबत जवळपास एक तास चर्चा करून यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयातील होत असलेल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यात यावी व रुग्णालयातील रक्ताचा मुबलक पुरवठा औषधीचा मुबलक साठा उपलब्ध व्हावा यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी या विशिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय महिला हक्क संविधानिक परिषदेच्या राज्याध्यक्ष मनीषा तिरणकर,भारतीय नारी रक्षा संघटनेचे सचिव तथा नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडियाचे सुकांत वंजारी,ॲड.रुपेश मानकर,राष्ट्रीय समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुमन तायडे,आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष मोबीन शेख आदी उपस्थित होते.

Copyright ©