यवतमाळ सामाजिक

गवळी सामजाचा निर्धार-गुणवंत विद्यार्थी सत्कार”

गवळी सामजाचा निर्धार-गुणवंत विद्यार्थी सत्कार”

यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाज बांधवाची सभा संपन्न.

आज दिनांक 23 मे 2024 रोजी सिनामाय मंदिर यवतमाळ येथे नंद गवळी समाज बांधवाची सभा आयोजित करण्यात आली या वेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यात सर्व प्रथम नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचां सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषगाने या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत गवळी समाजातील ईयत्ता दहावी आणि बारावी‌मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त तथा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्याचे ठरले.

सदर सभेस समाजातील माध्यमिक शिक्षक मा. यादवराव घोडे घाटंजी येथील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व मा. तुकारामजी चेके.

गवळी समाजातील उदयोन्मुख नेतृत्व तथा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष मा. अनिलभाऊ चावरे,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके, सुभाषभाऊ कालोकार, अमोलभाऊ घसाड, अनिलभाऊ आसटकार, संजयजी काळे ,

तसेच “नंद गवळी समाज युवा मंच” टीममधील सदस्य प्रितम चावरे , शाम भाऊ काकडे, विनोद कालोकार, पवन पाने,प्रथमेश घाटोळ, पवन झामरे, प्रकाश अवथळे, तसेच दूध विक्रीते किशोर भाऊ कालोकार, बाबुशराव गळहाट.

ईत्यादी समाज बांधव उपस्थित होते.तथा वरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठ शिक्षक श्रिकांतजी काळे आणि ‌वटबोरी गट ग्रामपंचायत चे उपसरपंच मा. रमेशजी झामरे यानी शुभेच्छा दिल्या.

तसेच सदर कार्यक्रमास समाजातील सर्व मान्यवरांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©