यवतमाळ सामाजिक

बोरी एसबीआय अंतर्गत व्यक्तिगत खाते विमा द्वारा- अपघात ग्रस्त तरुणाला मोठी मदत

बोरी अरब प्रतिनिधी (आशिष सावंकार)

बोरी एसबीआय अंतर्गत व्यक्तिगत खाते विमा द्वारा- अपघात ग्रस्त तरुणाला मोठी मदत

काही दिवसा पूर्वी पांढूर्णा येथील तरुण श्री संजय गोविंद आडे या तरुणाचा ट्रॅक्टरने मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये सुदैवाने तो बचावला .पण या मध्ये त्याचा एक पाय निकामी पडला. आणि कायमचे अपंगत्व या तरुणावरती आले. या बाबीची माहिती एसबीआय शाखा बोरी येथील व्यवस्थापकांना कळताच त्यांनी आपली संपूर्ण टीम त्या तरुणाच्या घरी पाठविली. आणि या सदर व्यक्तीने बचत खाते अंतर्गत व्यक्तिगत विमा काढल्याचे निदर्शनास आणून दिले. आणि त्याद्वारा या तरुणाला सुमारे पाच लाख रुपयांची मदत या विमा अंतर्गत झाली. यामुळे अक्षरशः त्या गरीब कुटुंबावर फार मोठा आघात निर्माण झाला होता .आणि या मदतीद्वारा त्या तरुणाला प्रचंड अशी मदत या अपघात विमा द्वारे झाली सदर तरुणाने संपूर्ण एसबीआय टीमचे आभार मानले. आणि गोरगरीब नागरिकांना सुद्धा या तरुणांनी संदेश दिला की आपण सुद्धा एसबीआय अंतर्गत विमा काढायला विसरू नका. सदर मदत देताना एसबीआय येथील अधिकारी मा.ओमप्रकाश कोटांगले मिलिंद बोरकुट राकेश राउत मंगेश गुलड़े कु.विधी महादुले कु.शारदा कटरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©