जिल्हा परिषद शाळा अर्जुना येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न
आज जिल्हा परिषद शाळा अर्जुना येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न झाला.यावेळी २०२४-२५ वर्षी पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याना डोक्यावर टोपी घालुन, हातात फुगे देऊन व बैलगाडी सजवून,पुढे बॅन्ड व लेझिम पथक त्यामागे बैलगाडी व सर्व विद्यार्थी ,शिक्षक व पालक होते अशी प्रभात फेरी काढली.
त्यानंतर शाळेत शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ वरकडे आणि शाळेचे मुख्याध्यापक माणिक डुकरे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी लाल फित कापून मेळाव्याचे उद्घाटन केले.
त्यानंतर २०२४-२५ च्या वर्ग पाहिलीतील विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सुजाता इंगोले यांनी तिलक लावून,खोब्रावडी खाऊ घातली.तसेच,चॉकलेट,बिस्कीट पुडा,स्केचपेन पाकीट देऊन फोटो घेतले.तसेच सर्व मुलांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून त्यांचे पाय कोपरात ठेवलेल्या कुंकू मध्ये भिजवून एका कोरे कागदावर त्याचे पावलांचे ठसे स्वतः घेतले. त्या कागदावर विद्यार्थ्यांचे नाव लिहिले होते.
त्यांनतर प्रत्येक मुलाला प्रत्येक टेबला वरील क्रिया करुन घेतल्या.
यावेळी मुख्याध्यापक माणिक डुकरे , गव्हाणकर ,कनाके , बेलगमवार ,कुडे , इंगोले ,आडे ,गंगाळवार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले.
Add Comment