Breaking News यवतमाळ

 जोडमोहा येथील आठवडी बाजाराचा संघमताने  हर्रास करून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा चुना

जोडमोहा येथील आठवडी बाजाराचा संघमताने  हर्रास करून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा चुना

ग्रामपंचायत सदस्यांनी केली गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील ग्रामपंचायत चा आठवडी बाजार लिलाव (सर्रास) १५ मार्च रोजी झाला असता सरपंच सचिवाने ठेकेदारा सोबत हातमिळवणी करुन गेल्या वर्षी च्या तुलनेत १ लाख १० रुपयाने कमी रुपयांनी दिल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी १९ मार्च रोजी गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांचेकडे केली आहे.

कळंब तालुक्यातील जोडमोहा यवतमाळ आदिलाबाद राज्य मार्गावर जोडमोहा मोठी ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामपंचायत चा सन २०२२-२३ चा आठवडी बाजार

लिलाव झाला असता हर्रास च्या बोली मध्ये ३,१०,००० रुपयांमध्ये गेला होता. यामुळे ग्रामपंचायत ला उत्पन्न सुध्दा वाढले होते.आणि या वर्षी त्या पेक्षा जास्त रुपयांनी जायला पाहिजे होता तिथे उलटी गंगा वाहने सुरू झाली आहे सन २०२४- २५ साठी १५ मार्च रोजी लिलाव ठेवण्यात आला असता सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांनी बोली बोलणाऱ्या ठेकेदारा सोबत हातमिळवणी करीत २,१००० (दोन लाख एक हजार) रुपयांमध्ये दिल्याने लिलावा मध्ये अनियमितता आढळून आली असता ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच/सचिव यांना विनंती करीत लिलाव रद्द करण्यासाठी सांगितले असता त्यांना न जुमानता इतक्या अत्यल्प दरात आठवडी बाजार देऊन ग्रामपंचायत चे आर्थिक नुकसान केले आहे. यामध्ये सरपंच / सचिवांचा मनमानी कारभार दिसून येत असल्याने व सर्रास (लिलाव) करते वेळी पंचायत समितीचा विस्तार अधिकारी वगैरे उपस्थित पाहीजे असता त्यांना सुध्दा न कळविता पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित सचिव/सरपंच यांनी लिलाव केला आहे. गेल्या वर्षीच्या लिलाव रक्कमे मध्ये वाढ तर सोडाच उलट १ लाख १० हजार रुपयांनी कमीने दिल्याने सरपंच/ सचिवावर संशय निर्माण झाला असल्याने जोडमोहा ग्रामपंचायत चे सदस्य पवन प्र. जाधव व बापुराव क. चव्हाण यांना १९ मार्च रोजी कळंब पंचायत समिती मध्ये येऊन गट विकास अधिकारी यांना लिलाव रद्द करण्यासाठी तक्रार केली आहे. जर लिलाव रद्द न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे पत्रकारशक्ती च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.

Copyright ©