यवतमाळ सामाजिक

पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे हस्ते कू. मायसी चव्हाण सन्मानित

पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे हस्ते कू. मायसी चव्हाण सन्मानित

नॅशनल कौन्सिल फॉर इंस्प्रेशन अँड डेव्हलपमेंट,(NCID)यांचे वतीने जागतिक अभिरुची संपन्न प्रतिभा शक्तीच्या एकत्रिकरणाचा महा संकल्प अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्र धर्मासाठी तत्पर कार्य वीरांचा गुण गौरव करणारे १६ वे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महा संमेलन २०२४ रविवार दि.१७ मार्च ला रेलिश फंक्शन हॉल अमरावती येथे संपन्न झाले.विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा नारी शक्ती पुरस्कार.हिरकणी पुरस्कार व रेडियंट एक्षलंस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घघाटन श्री.रवींद्र वैद्य यांनी केले संमेलनाच्या अध्यक्षपदी रेमेन मॅगसेसे .पद्मश्री पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विजय वाढई पुणे डॉ.समीर शेंडे वर्धा डॉ. गुरतेज ब्रार पंजाब श्री.यशवंत कर्वे नागपूर हे होते.या सोहळ्यात विशेष आकर्षण होती ती अकरा महिने सतरा दिवसाची कू. मायसी लेखराज चव्हाण रा .माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ हिला मान्यवरांचे हस्ते रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रिकार्ड अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस .देवेंद्र यांनी केले तर या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन डॉ.क्रांती महाजन यांनी केले या वेळी बरीच मंडळी हजर होती.

Copyright ©