यवतमाळ सामाजिक

विजयकुमार ठेंगेकर यांच्या “चिऊ आणि पिहू” कथेस राज्यस्तरीय सन्मान

 

विजयकुमार ठेंगेकर यांच्या “चिऊ आणि पिहू” कथेस राज्यस्तरीय सन्मान

पुणे येथील अलाईव्ह फाउंडेशन चे “चला चिऊ वाचवू” अभियान

अलाईव्ह फाउंडेशन, पुणे द्वारा जागतिक चिमणी दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “चला चिऊ वाचवू…” अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या “राज्यस्तरीय कथा स्पर्धेत यवतमाळ येथील लेखक कथाकार विजयकुमार ठेंगेकर यांच्या “चिऊ आणि पिऊ” या कथेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना नुकतेच पुणे येथील इंद्रधनुष्य पर्यावरण सेंटर मध्ये पार पडलेल्या भव्य समारंभात आंतरराष्ट्रीय वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. सुधीर हसमनिस व इमिनएन्ट आर्टिस्ट संदिप यादव यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजयकुमार ठेंगेकर हे इयत्ता दहावी पासून साहित्य क्षेत्रात असून त्यांनी त्याच्या लेखनाची सुरुवात 1995 ला दैनिक देशोन्नती वृत्तपत्रातून केली. पुढे त्यांनी दैनिक लोकमत, देशोन्नती, हिंदुस्तान, नमो महाराष्ट्र, तरुण भारत, पुण्यनगरी, सकाळ, नवराष्ट्र, मातृभूमी इत्यादी वृत्तपत्रासह महाराष्ट्रातील बहुतांश दिवाळी अंकांना साहित्य लेखन केले आहे. तर याच दरम्यान त्यांनी दैनिक नमो महाराष्ट्र व दैनिक हिंदुस्थान ला सहसंपादक म्हणून कामही केले आहे.

तसेच आकाशवाणी करिता कथालेखन, काव्य लेखन, नभोनाट्य, रूपक, बालनाट्य लेखन व फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाचे लेखनही केले आहे.

तर त्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले असून त्यात स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मा. मनोहरपंत जोशी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

तसेच हुंडा विरोधी चळवळ मुंबई द्वारा आयोजित राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातून सतत दोनदा प्रथम पुरस्कार व रोशनलाल तलवार ट्रॉफीचे मानकरी ठरले असून मुंबई विद्यापीठांमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

मनस्वी समाज निर्माण संस्था, नवरगाव ता. मारेगाव यांचा “काव्य श्री पुरस्कार”,

पुरोगामी विचार मंच, यवतमाळ द्वारा आयोजित विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार.

वृत्तपत्र लेखक संघटना, पुणे यांचा सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखन पुरस्कार,

मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था ढाणकी तालुका उमरखेड यांच्या मराठी भाषा दिनानिमित्तच्या राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धेत प्रथम सन्मान प्राप्त केला आहे.

तर त्यांचा” प्रेमांकुर” हा संपादित प्रातिनिधिक काव्य संग्रह, “दस्तऐवज : माहितीचा अधिकार अधिनियम 2005” हे संपादित पुस्तक प्रकाशित झाले असून त्यांचे “शिंपल्यातील मोती” हा वैचारिक संग्रह, “प्राजक्ताची फुले” हा कथा संग्रह, “पेटलेलं पाणी” हा संपादित प्रातिनिधिक काव्य संग्रह यासोबतच कादंबरी व लेख संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

त्यांना या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई द्वारा दिला जाणारा “राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2021” देऊन गौरविण्यात आले आहे.

Copyright ©