यवतमाळ सामाजिक

“१ नव्हे तर तब्बल १८ विद्यार्थ्यांची कृषिसेवक पदी निवड”

“१ नव्हे तर तब्बल १८ विद्यार्थ्यांची कृषिसेवक पदी निवड”

कृषी सेवक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत नागपूर व अमरावती विभागातून साधारणतः १७२७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.सदरील परीक्षा ही (आयबीपीएस-टीसीएस) च्या माध्यमातून राज्यभरात दिनांक १६ ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल १२ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.व अंतिम निवड यादी दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आली.यामध्ये ‘कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था,द्वारा संचालित संपूर्ण रॅक परीवार,यवतमाळ च्या तब्बल १८ विद्यार्थ्यांची विदर्भातील नागपूर व अमरावती या प्रशासकीय विभागात ‘कृषीसेवक’ पदी निवड झाली.यात समीक्षा होडगिर ही १५१ गुण घेत नागपूर विभागातून भज-क प्रवर्गातून दुसऱ्या स्थानी आली.तसेच उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये सुमित निलकंठ,श्रीकांत बाकडे,देवाशीष देवगडे,सूरज आत्राम,सौरभ चौधरी,प्रवीण थोटे,प्रीती नेमाडे,वैभव कडू,लक्ष्मी ढोंगे,जागृती गुंडावार,आचल भगत,नम्रता गिर्हेपुंजे,अनुश्री जसुतकर,समीक्षा वाघ,शीतल होडगीर,सूरज भोयर,रोशन दाबेराव,ऋतुजा भोयर इत्यादी विद्यार्थ्यांची ‘कृषीसेवक’ पदी नागपूर तसेच अमरावती विभागात नियुक्ती झाली.नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.पंढरी पाठे यांनी अभिनंदन करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.संस्थेने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे जिल्हाभर कौतुक होत आहे.

Copyright ©