यवतमाळ सामाजिक

रेती माफियांचा मोर्चा आता सेतू कडे,पुन्हा एका माफियांचा भर

रेती माफियांचा मोर्चा आता सेतू कडे,पुन्हा एका माफियांचा भर

रेती माफिया कडून रेती तस्करी थांबवण्यात शासनाला अपयशच येत आहे मोह तिथे माया मग तस्करी थांबणार तरी कशी शासनाने कोणताही पर्याय काढला तरी माफिया एक पाऊल पुढेच आहे

शासनाने गोर गरिबांना ऑनलाईन पद्धतीने रेती केवळ सहाशे रुपये घेऊन देण्याचा पर्याय शोधला संपूर्ण जिल्ह्यात हे काम सेतू धारकान कडे सोपविण्यात आले जेणे करून अल्प दरात घरकुल धारकांना रेती उपलब्ध व्हावी म्हणून यात मात्र रेती माफियानी शक्कल लढवत सेतू धारकांना आमिष देऊन त्यांच्या मार्फत रेती तस्करी करण्यास सुरुवात केली रेती माफिया कडून पन्नास साठ आधार कार्ड जमा करणे सेतू धारकांना जादा पैसे देऊन दहा ते वीस ब्रास रेतीची उचल करून गरजू गरिबांना चक्क पाच हजार रुपये ब्रास ने विक्री केल्या जात आहे यात सेतू धारकास जादा पैसे देऊन खुले आम् हा गोरख धंदा सुरू करण्यात आला आहे चार ब्रास मागे पाच हजार सेतू धारकांना दिल्या जाते,या रेती माफियात पांढऱ्या बागळ्याचीही भर पडल्याने रेती तस्करीला सोन्याचे महत्त्व आले असल्याने यात एक पाव खर्च आणि तीन ते चार पाव आवक असल्याने खुले आम् मोठ्या प्रमाणात रेतीची उचल करीत आहे,तस्कर अनेकांचे आधार कार्ड जमा करून एकच तस्कर शेकडो ब्रास रेतीची उचल करीत आहे आणिआणि गरजू लाभार्थी वंचित राहत आहे,आणि हेच तस्कर चढ्या भावांनी घरकुल धारकांना विकत आहे यात घरकुल धारकांची खुले आम् लूट केल्या जात आहे घरकुल धारकांच्या नावावर माफियांचा गल्ला भरल्या जात आहेत तर आर्णी व इतर ठिकाणी काही तस्कर नदीत बोट टाकून पोकल्यांड द्वारे रेतीचा उपसा करीत असतांनाही महसूल विभाग निद्रिस्त कसा असा सवाल प्रकाशभाऊ लंगोटे यांनी केला जिल्ह्यातील त्वरित तस्करी बंद करून गरजू घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ न मिळाल्यास प्रकाश भाऊ लंगोट जिल्हा अधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशारा देण्यात आला

Copyright ©