यवतमाळ राजकीय

मनसेचा दणका अंतोदय कार्डधारकांना फाटक्या साड्या वाटप प्रकरणात मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या तक्रारीनंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अधिकाऱ्यांचे पथक यवतमाळात चौकशीसाठी दाखल.

मनसेचा दणका अंतोदय कार्डधारकांना फाटक्या साड्या वाटप प्रकरणात मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या तक्रारीनंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अधिकाऱ्यांचे पथक यवतमाळात चौकशीसाठी दाखल.

भरारी पथकाने यवतमाळ सह ग्रामीण भागातील अंतोदय कार्डधारकांच्या व रेशन दुकानदारांकडे उपलब्ध साड्यांची तपासणी. चौकशी समिती समोर नागरिकांनी मांडल्या संतप्त प्रतिक्रिया.. फाटक्या खराब साड्या मनसेकडे जमा करण्याचे आवाहन.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपीटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्रोद्योग मंत्रालय कडून सर्व अंत्योदय राशन कार्डधारकांना साडीचे वाटप करण्यात आले. एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनाने सर्व राशनकार्ड धारकांना साडीचे वाटप केले. परंतू यातील बहुतांश साड्या ह्या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहे. मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीचे दखल घेत मनसेचे अनिल हमदापूरे यांनी या प्रकारा विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी पथक नेमण्यात येऊन वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त यांनी यवतमाळ येथे वस्त्रोद्योग महामंडळाचे चौकशी अधिकारी दत्तात्रय रोहनकार व प्रवीण कोल्हे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांना तात्काळ यवतमाळ येथे संबंधित प्रकरणाची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने काल यवतमाळ येथे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या दालनात मनसेचे अनिल हमदापुरे यांना संबंधित चौकशी पथकाची भेट घालून देण्यात आली. यवतमाळ सह इतर ग्रामीण भागात हा जो सर्व भोंगळ कारभार सुरू आहे. या संदर्भात अनिल हमदापुरे यांच्यासह या चौकशी अधिकाऱ्यांनी सोबत तालुका पुरवठा अधिकारी सीमा दोंदल व इतर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा या चौकशी समिती समावेश होता. काल दिवसभर शहरातील रास्त धान्य दुकानदार तसेच ज्या अंतोदय कार्डधारकांना फाटक्या साड्यांचे वाटप करण्यात आलं होतं त्या नागरिकांच्या भेटीगाठी या चौकशी समितीने घेतल्या. याप्रसंगी अंतोदय कार्डधारक नागरिकांनी सरकार विषयी आपला रोष व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांसमोर या दळभद्री सरकारचे वाभाडे काढले . आणि मनसेने या सर्व प्रकरणाची पोलखोल केल्याच्या अनुषंगाने अनिल हमदापुरे यांचे कौतुक करत संपूर्ण जिल्हाभर अशाच प्रकारचा कारभार या साडी वाटपात झाले असल्याची माहिती चौकशी समितीला दिली.ग्रामीण भागातील काही महिलांनी आपल्या संताप्त प्रतिक्रिया नोंदवल्या, काही महिलांनी तर मनसेच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत या साड्या शासनाला परत न करता थेट मनसेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना देऊन या सर्व प्रकरणाची पोलखोल करण्याचे आवाहन मनसेला केले. संबंधित पुरविण्यात आलेल्या साड्या ह्या वापरलेल्या साड्या असून चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या अनेक साड्यांना पिको फॉल करण्यात आले होते. तसेच काही साड्यांना वापरल्यानंतर घामाचे वगळ त्यावर स्पष्ट दिसून येत होते. काही साड्या चक्क फाटलेल्या स्वरूपात होत्या.याप्रसंगी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत आम्ही आमच्या शेताला डुकरा पासून वाचवण्यासाठी ही यापेक्षा चांगली साडी लावतो अशा मिश्किल शब्दात सरकारचे वाभाडे काढले.शासनाने गोरगरिबांची यापूर्वी अशी क्रूर थट्टा कधीच केली नव्हती ,बाजारात ज्या साड्या टाकाऊ म्हणुन फेकतात त्याच प्रकारच्या साड्या सर्वसामान्य जनतेला वाटण्यात आल्या. आधीच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची क्रूर थट्टा करत सर्वसामान्य नागरिकांना वाटण्यात आलेल्या साड्या या फाटक्या असून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. याप्रसंगी बोलताना अनिल हमदपूरे यांनी शासनाच्या सुलतानी संकटांनी त्रस्त जनतेचा हा अपमान असून “भीक नको पण कुत्रा आवर” अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांवर सरकारला म्हणायची आली आहे. मनसेच्या माध्यमातून अंतर्गत राशन कार्ड धारकांना आव्हान करण्यात येते की ज्या नागरिकांना फाटक्या, वापरलेल्या, खराब साड्या प्राप्त झाल्यात त्यांनी मनसेकडे 9822460388 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी हा सर्व अहवाल काल वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त महाराष्ट्र यांना सादर केला असून या अहवालावर बोलताना मनसेचे अनिल हमदापूरे यांनी या प्रकरणात दोषी अधिकारी कंपनी कंत्राटदार व दलाल यांच्यावर कडक कारवाईची मागणी या चौकशी समिती समोर केली. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे लकी छंगाणी, प्रथमेश मीठे, मयूर कारंजकर, सौरभ अनसिंगकर या दौऱ्या दरम्यान उपस्थित होते.

Copyright ©