यवतमाळ राजकीय

कांग्रेस पार्टी कार्यालय यवतमाळ येथे नारी न्याय संमेलन आयोजित 

कांग्रेस पार्टी कार्यालय यवतमाळ येथे नारी न्याय संमेलन आयोजित 

यवतमाळ जिल्हा शहर महिला काँग्रेस च्या वतिने दि 11/3/24राष्ट्रीय अध्यक्ष अल्का लांबाजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्याताई सवालाखेजी यांच्या निर्देशानुसार कांग्रेस पार्टी कार्यालय यवतमाळ येथे नारी न्याय संमेलन आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंत राव पुरके साहेब होते . प्रमुख उपस्थित सुधा खड़के,कमल तायड़े,आशा देशमुख होते प्रस्ताविक शहर अध्यक्ष उषा दिवटे यांनी केले जिल्हा अध्यक्ष वंदना आवारी यांनी

महिला यौन शोषण, महागाई

बेरोजगारी

महिला आर्थिक शोषण होत असून महिलांनी सक्षम होण्या विषयी मार्गदर्शन केले

माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महीलांनी संघटित कार्य करावे कारण महीलाच महीलांपर्यंत पोहचू शकतात असा सल्ला दिला ,याप्रसंगी महीला कांग्रेस च्या उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून रत्नाताई मिसळे व उत्कृष्ट समाजसेविका म्हणून सुधाताई खडके यांचा शाल ,श्रीफळ व सत्कार चिन्ह देवून सत्कार करण्यात आला तसेच महिला दिनाचे औचित्य साधून घरघुती कामगार महीलांचा साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला .महीलांसाठी विविध गेम्स घेण्यात आले . कविता बोगुलवार,मिना सरतापे, संजिवनी कासार, गायत्री नवाडे,ज्योती आरणकर, लियाकत सेख, धनश्री उके,सुरेखा वडीचार, संगीता उमरे, कल्पना मुनेश्वर, विद्या परचाके,निशा नागतोडे, सविता चौधरी , रूपाली मासाळ यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले तर जयश्री मडावी यानी सुत्र संचालन केले तर अल्का महाकुलकर यांनी आभार प्रदर्शन केले.असे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पुसनाके यांनी कळवले आहेत.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©