Breaking News यवतमाळ

वटबोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

वटबोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावर वटबोरी जवळ ऑक्सिजन पार्क जवळ घाटंजी वरून सोनखास मार्गे यवतमाळला जात असताना दुचाकी क्रमांक एम एच 29बी एम 0692 होंडा एक्टिवा ने जात असताना वटबोरी जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत फैझान नगरिया वय 23 राहणार मारुती वाड घाटंजी जिल्हा यवतमाळ हा तरुण जागीच ठार झाला भीषण धडकेत फैजान यांच्या डोक्यावरून अज्ञात गाडीचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला ही घटना 11 मार्च सोमवार सायंकाळी सहा वाजता ची घटना घटनास्थळी यवतमाळ ग्रामीण पोलीस यांनी भेट दिली असून पंचनामा केला व घटनास्थळी घाटजी वरून मुलाचे वडील दाखल झाले व जोडमोहा जवळील हायवे पोलीस चौकी सुरू असती तर अज्ञात वाहन सापडले असते तरी जोडमोहा जवळील हायवे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिक जोर धरित आहे

Copyright ©