अंत्योदय कार्डधारकांना वाटलेल्या निकृष्ट साड्या विरोधात मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना मनसे तर्फे फाटक्या साड्या भेट देणार. अनिल हमदापुरे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपीटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्रोद्योग मंत्रालय कडून सर्व अंत्योदय राशन कार्डधारकांना साडीचे वाटप करण्यात आले. एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनाने सर्व राशनकार्ड धारकांना साडीचे वाटप केले. परंतू यातील बहुतांश साड्या ह्या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहे. मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीचे दखल घेत मनसेचे अनिल हमदापूरे यांनी या प्रकारा विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा सर्व प्रकार सांगितला. याप्रसंगी या संबंधित कंपनी अथवा कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करत त्याचा काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
शासनाने गोरगरिबांची यापूर्वी अशी क्रूर थट्टा कधीच केली नव्हती ,बाजारात ज्या साड्या टाकाऊ म्हणुन फेकतात त्याच प्रकारच्या साड्या सर्वसामान्य जनतेला वाटण्यात आल्या. आधीच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची क्रूर थट्टा करत सर्वसामान्य नागरिकांना वाटण्यात आलेल्या साड्या या फाटक्या असून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. याप्रसंगी बोलताना अनिल हमदपूरे यांनी शासनाच्या सुलतानी संकटांनी त्रस्त जनतेचा हा अपमान असून “भीक नको पण कुत्रा आवर” अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांवर सरकारला म्हणायची आली आहे. शासनाने वाटप केलेल्या साड्या ज्या कंपनीमार्फत वाटण्यात आल्या त्या संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करून सर्वसामान्य जनतेची थट्टा करणाऱ्या कंपनीवर अथवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून शासन दरबारी काळ्या यादीत समावेश करण्यात यावा जेणेकरून पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असे मत व्यक्त केले.संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास या सर्व निकृष्ट साड्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना मनसेच्या वतीने भेट देण्याचा ईशारा मनसेचे अनिल हमदापूरे यांनी दिला. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे लकी छागाणी, प्रथमेश मीठे, अमोल ठाकरे, सौरभ अनसिंगकर, मयूर कारंजकर, अनिकेत मिठे मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment