आझाद नारी फाउंडेशन, यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर व महिला महोत्सव-२०२४ अंत्यत उत्साहात संपन्न!!
आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित “जागर स्त्री-अस्मितेचा सोहळा स्त्री स्वातंत्र्याचा” कार्यगौरव सन्मान लेक साऊंची पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता! यावेळीं विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा लेक साउंची पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यामध्ये उद्योजक मंगलाताई गवई, प्रेमलता सोनवणे दारूबंदी कार्यकर्ता, नंदाबाई सुरवाडे सामाजिक कार्यकर्ता , सुमय्या अली संचालक नारी शक्ती फाउंडेशन, शारदा खाडे संचालक हरित क्रांती अग्रोटेक, जयश्री वानखडे महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त ग्राम सचिव, श्रद्धा सिसोदिया प्रशिक्षक, डॉक्टर महेश आखाडे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर इंगळे मॅडम वैद्यकीय अधिकारी, कु.अनिता सोळंके उमेद तालुका अभियान व्यवस्थापक, सीमाताई पाटील प्रभाग संघ अध्यक्ष, आम्रपाली शेगोकार प्रशिक्षक, अंगणवाडी सेविका सुमित्रा खरात, ललिता सुरवाडे अंगणवाडी सेविका शितल मोताळकर सावित्रीबाई फुले फाउंडेशन व उमा टिकार आशा वर्कर इत्यादी नामवंत महिलांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळीं पुरस्कार देण्यामागची भूमिका व संस्थेच्याकार्याबद्दल संचालक राहुल सुरवाडे यांनी सविस्तर महिती दिली!
तर पुरस्कारास उत्तर म्हणून दारूबंदी कार्यकर्ता प्रेमलताताई सोनोने यांनी सांगितले की, दारूमुळे माणूस अमानवीय व क्रूर होतो त्याची नियत खराब होते त्याला आपला कोण परका कोण समजत नाही आज अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे “दारूची तिजोरी देशीचाचं ठेवा उघड बार देवा आता उघड बार देवा” एवढीही भयंकर गोष्ट या मातृत्तीर्थ जिल्ह्यामध्ये घडत आहे हे प्रचंड लाजिरवाणी बाब असून लवकरचं याला आळा बसण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करण्याची गरज आहे असे त्यांनी बोलताना सांगितले!
तर सुमय्या अली संचालक नारी शक्ती फाउंडेशन यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांनी सुद्धा आता घराच्या बाहेर त्यांच्या हक्काधिकारासाठी लढण्याची नितांत गरज असून महिलांनी सामाजिक उत्थानासाठी पुढे यायला हवे. तरच या देशाची समाजाची प्रगती होईल!
महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त ग्रामसचिव जयश्री वानखडे यांनी बोलताना सांगितले की, ग्रामसचिव यांनी ठरवले तर गावाचा विकास लोकांना विश्वासात घेवून होऊ शकते फक्त कार्यशील ग्रामसचिवांची गरज आहे देश समृद्धी कडे घेवून जाण्यासाठी.!
मी माझ्या कार्यकाळात असंख्य पुरस्कार मिळविले मात्र कामाची इमान राखत मी माझं कार्य करीत राहिले म्हणून माझा सन्मान होतो आहे मी जिथे माझी ड्युटी असेल तिथे गावाला समृद्धी कडे घेवून जाण्यासाठी विकास आराखडा तयार करते व पुढिल कार्य शैली त्याप्रमाणे करते!
अध्यक्षीय भाषणात नंदाताई म्हणाल्या की, जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांने महिलांचा सन्मान करावा एवढं मोठं मन प्रत्येक पुरुषांने महिलांन प्रति बाळगलं तरी ही भारत माता समृद्ध होईल!!
यावेळीं, व्ही.आर.उईके, ऍड. योगेश वासनिक, एस.एम.इंगळे, हसीना जी शेख, सुजाता तिडके, शेंडे साहेब,गौतमभाऊ गवई, डॉ.एम.ए. शेख, गजानन आठवले, डॉ. असिफ खान, धम्मा गवई, एजाजभाई, सुभाष सुरवाडे, हरिभाऊ जुमळे, रमेश सुरवाडे, शिवगंगा ठाकरे, विठ्ठल घोंगे, आशा बोहरपी, नलिनी खंडारे, शिवहरी चिकटे, विशाखा इंगळे, शारदा उमाळे, दिव्या दुतोंडे, मंजुळाबाई करंगाळे व मोठ्या प्रमाणात महिला संघ, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर मदतनीस ताई, महिला गटाच्या अध्यक्ष सचिव व महिला भगिनी गावातील ग्रामस्थ मंडळी व निमंत्रित मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. रजनीताई, शशिकलाताई ,तेजश्री, तिडके मॅडम ,मानव , करण, सोपान शंतनू व अंश यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-कपिल देव अवचार यांनी केले तर आभार उमाताई टिकार यांनी मानले.!
Add Comment