Breaking News यवतमाळ

गांधीनगर शेतात काम करत असताना रान डुक्कराच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी

गांधीनगर शेतात काम करत असताना रान डुक्कराच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी

गांधीनगर शेतात काम करत असताना रान डुक्करने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली. जखमी झालेल्या शेतकऱ्याला मेटीखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते जबर मार असल्या मुळे त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले

याबाबत अधिक असे की, गांधीनगर ते पार्डी रस्त्यावरील शिवारातील शेत नंबर 53 या शेतात शेतकरी राहुल बाबाराव मिंढे रा. गांधीनगर हे नेहमीप्रमाणे सोमवार 11 मार्च रोजी सकाळी शेतात कामासाठी गेले. त्यावेळी शेतात काम करत असतांना सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर रान डुक्कराने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला, हाताला, पोटाला चावा घेऊन आतडी बाहेर काडली आणि पायाला चावा घेतला. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने मेटीखेडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गांधीनगर शिवारातील शेतात रान डुकरांना वावर अधिक वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

Copyright ©