यवतमाळ सामाजिक

“राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील ग्रामपंचायत सेवारत्न पुरस्कार 2024”

“राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील ग्रामपंचायत सेवारत्न पुरस्कार 2024”

ग्रामपंचायत तेंडोळीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, महाराष्ट्र राज्य, मुंबईचा दिला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील ग्रामपंचायत सेवारत्न पुरस्कार 2024” यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेंडोळीला नुकताच प्राप्त झाला आणि हा पुरस्कार यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सरपंचा सौ सपनाताई र. राठोड आणि सचिव विजयकुमार ठेंगेकर यांना देऊन सन्मानित केले

तेंडोळी गावामध्ये शाश्वत विकास आणि पायाभूत सुविधा जरी कमी असल्या तरी गेल्या एक ते दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविले गेले आहेत त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, स्वच्छता, उपजीविका अशा या उपक्रमांच्या आधारावर आणि गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभे होत असलेले दोन प्रकल्प सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय शिवाय गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविले त्यामध्ये शिवणक्लास प्रशिक्षण, बाकरवडी प्रशिक्षण,ब्युटीपार्लर प्रशिक्षण यासारखे वर्ग चालवून महिला समूहाने सुरू केलेल्या मसाले आणि बाकरवडी उद्योग, कापड व्यवसाय, किराणा व्यवसाय यासारख्या गावाला दिशा देणाऱ्या प्रकल्पाच्या आधारे शिवाय महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वांना सोबत घेऊन

राबविलेले उपक्रम तसेच केंद्रीय उपसचिव पंचायत राज नरेशकुमार, नवी दिल्ली यांनी दिलेली भेट, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशनच्या प्रशिक्षणार्थींचा अभ्यास दौरा, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), गट विकास अधिकारी, आर्णी, विस्तार अधिकारी, आर्णी यांनी केलेल्या कौतुकाच्या व मार्गदर्शनाच्या जोरावर हा पुरस्कार ग्रामपंचायतीने खेचून आणला आहे.

यामुळेच या गावाकडे बघण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन बदलला असून नुकत्याच आदर्श ग्राम साठी तालुक्यातून निवडल्या गेलेल्या दोन गावांमध्ये तेंडोळीचा समावेश आहे. व तसे अधिकृत पत्र देखिल प्राप्त झाले आहे.

या सर्व कार्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright ©