Breaking News यवतमाळ

साडीपेक्षा आमच्या घरची गोधडी बरी ,ही तर आमची थट्टा आहे

साडीपेक्षा आमच्या घरची गोधडी बरी ,ही तर आमची थट्टा आहे

राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक अत्योदय कुटुंबांना मोफत एक कार्ड एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या योजनेच्या अंमलबजावणीत आज कळंब तालुक्यातील जोडमोहा रास्तभाव दुकानातून मोफत साड्या वाटप करणे सुरू झाले असून, याच योजनेतून जोडमोहा येथे वाटप करण्यात आलेल्या साड्या मधील काही साड्या फाटक्या व कुजलेल्या अवस्थेतील असल्याचे समोर आले आहे हीच अवस्था संपूर्ण जिल्ह्यातील दिसून येत आहे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग यांनी जारी केलेल्या निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय कार्ड धारक कुटुंबांना हा लाभ देण्यात येणार असून यंत्रमाग मंडळ ही योजना राबवित असल्याचे सांगण्यात येत आहे, या साडीची किंमत ३५५ रुपये आहे. या व्यतिरिक्त वाहतूक जाहिरात प्रसिद्धी

साठवणूक व हमाली असा अतिरिक्त खर्चही सरकार करीत आहे. या योजनेचा गाजावाजा करीत गरिबांना फाटक्या साड्या,तर काही साड्यांना तेलाचे डाग दिसत आहे त्या साड्या जणू काही मंदिरातील दान केलेल्या, त्याच आम्हाला दान करीत आहे का ? असाही प्रश्न गरीब वर्गा कडून करण्यात येत आहे.वाटप करून सरकार गरिबांची थट्टा करीत असल्यामुळे जोडमोहा येथील नागरिकांनी या घटने बाबत राज्य सरकारचा निषेध करीत आहे.

Copyright ©