यवतमाळ शैक्षणिक

वाधवाणी फार्मसी महाविद्यालयात “स्मार्ट गर्ल वर्कशॉप” विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन

वाधवाणी फार्मसी महाविद्यालयात “स्मार्ट गर्ल वर्कशॉप” विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन

स्थानिक पी वाधवानी फार्मासि महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून स्मार्ट गर्ल वर्कशॉप या विषयावर दिनांक ०६ व ०७ मार्च २०२४ रोजी महाविद्यालयाच्या श्रोतुगृहामध्ये वाधवानी फार्मसी महाविद्यालयाच्या व भारतीय जैन सन्घटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकरिता दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या प्रथम सत्राच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ अनिल चांदेवार व डॉ मनीषा किटुकले आणि प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जैन सन्घटनेच्या वतीने श्री. रत्नाकर महाजन व श्रीमती चेतना जैन मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत वाढते रोपटें देऊन करण्यात आले. प्रा. कु प्रतीक्षा मेश्राम ह्यांनी कार्यशाळेचे मुख्य उद्देश प्रास्ताविकातून प्रकट केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल चांदेवार ह्यांनी आयोजित कार्यशाळेचे महत्व पटवून दिले. तसेच आयोजित कार्यशाळा विद्यार्थिनींच्या प्रगती व जडणघडनाकरिता किती महत्वपूर्ण आहे ह्याबाबत मार्गदर्शन केले. प्रथम दिवसीय सत्रात विद्यार्थिनींना आत्मभान, महिला आरोग्य, संवाद आणि नातेसंबंध तर द्वितीय दिवसीय सत्रात आत्मसन्मान, स्वसंरक्षण, पर्याय व निर्णय, मैत्री व आकर्षण, पालकांसोबत संवाद असे आणि बरेच विषय शिकायचे आहेत. भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजनात श्री. विजय बुंदेला यांनी अमूल्य सहभाग दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु प्रतीक्षा मेश्राम ह्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीते करीता समन्वयक म्हणून प्रा. कु. रुपाली चव्हाण, प्रा. कु. शैलजा गावंडे व सह-समन्वयक म्हणून प्रा. कु. दीक्षा बैस, प्रा. कु. शुभदा गणवीर, प्रा. कु. मनीषा चव्हाण, प्रा. कु. शिवानी सुर्यवंशी प्रा. कु. पूजा देवानी, प्रा. श्री. ऋषिकेश वानोळे व सर्व शिक्षक वृंदानी प्राचार्य डॉ मनीषा किटुकले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले.

Copyright ©