यवतमाळ सामाजिक

महाशिवरात्री निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात 9 ठिकाणी शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन !

महाशिवरात्री निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात 9 ठिकाणी शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन !

यवतमाळ – शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची श्रद्धापूर्वक उपासना करतात. शास्त्र समजून शिवोपासना केल्यास उपासकाची भावभक्ती अधिकच वृद्धींगत होते, आणि त्याचा अधिकाधिक लाभ उपासकाला होतो. शिवोपासनेत प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घेण्यापासून ते शिवपूजा करण्यापर्यंत अनेक कृतीचा समावेश होतो. शिवभक्तांना महाशिवरात्रीचा अध्यात्मिक स्तरावर पुरेपूर लाभ व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने शहरासह जिल्ह्यात शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येणार आहे, त्यामध्ये शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र, शिवाला बेल वाहने, शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा घालणे, शृंगदर्शन कसे घ्यावे? महाशिवारात्रीचे व्रत कसे करावे? इत्यादी, तसेच आयुर्वेदिक वन्औषधी, बालसंस्कार, भाषासंवर्धन, राष्ट्र धर्म, अध्यात्म, साधना, स्वभावदोष अहंनिर्मूलन प्रक्रिया, गुरुकृपायोगनुसार साधना, आनंदी जीवन कसे जगावे?, यासंदर्भात ग्रंथ उपलब्द असणार आहेत, तसेच देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, जपमाळ, भीमसेनी कापूर,सात्विक उदबत्ती व कुंकू इत्यादी पूजोपयोगी साहित्य वितरणासाठी उपलब्द असणार आहे.

हे ग्रंथ प्रदर्शन जिल्ह्यात पुढील ठिकाणी असणार आहे,

1) श्री केदारेश्वर मंदिर, यवतमाळ (स.7 ते रात्री 9),

2) श्री कमलेश्वर मंदिर, लोहारा(स.7 ते रात्री 8 )

3)श्री पाळेश्वर मंदिर,दिग्रस( दुपारी 3 ते 7)

4)श्री शिवमंदिर चिखलगाव,वनी(स.10.30 ते सायं 5 ),

5) श्री मल्लिकार्जुन मंदिर,दारव्हा. (स. 9 ते सायं.7)

6) श्री धनकेश्वर महादेव मंदिर,पुसद(स.10 ते साय 7)

7) श्री मनदेव मंदिर, आर्णी रोड (स.8 ते सायं. 6)

8)श्रीओंकारेश्वर महादेव मंदिर,दाभडी आर्णी(स.9 ते 6)

9)श्री सिद्धेश्वर मंदिर,कारंजा ( स.9 ते सायं.9)

वरील दिलेले ग्रंथ कक्ष मिळण्यामध्ये अडचण आल्यास 9970752507 या क्रमांकावर संपर्क करावा.

या शिवविषयक ग्रंथ प्रदर्शनीचा शिवभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सौ.सुनीता खाडे,सनातन संस्था यवतमाळ, 9970752507

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©