यवतमाळ जिल्ह्यात बायो पेस्टिसाइड ची अनधिकृत विक्री करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करा कृषी संचालकांचे आदेश.
लेबल क्लेम नसणाऱ्या बायो पेस्टिसाइड कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा-अनिल हमदापुरे
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होवून सुद्धा जिल्हा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोपेस्टीसाईड विकणाऱ्या कंपण्या मोठ्या प्रमाणात बायोपेस्टीसाईडची विक्री अनधिकृतपणे सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात सेन्सेशनल अॅग्री इन्पुटस् प्रा.लि. हैद्राबाद नावाच्या कंपनीने कुठल्याही प्रकारचे लेबल क्लेम नसतांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोपेस्टीसाईडची विक्री सुरु केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना अंधारात ठेवून लेबल क्लेम नसतांना सदर बायोपेस्टीसाईडची विक्री होऊच कशी शकते? या विषयावर मनसेचे अनिल हमदापूरे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मनसेच्या शिष्टमंडळासह निवेदन देऊन या सर्व भ्रष्ट कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कृषी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कृषी विभागाने यावर चौकशीचे आदेश देऊनही कुठलीच कारवाई न केल्यामुळे मनसेचे अनिल हमदापूरे यांनी कृषिमंत्री आणि कृषी सचिव व कृषी आयुक्त यांना या सर्व विषयाचे गांभीर्य तक्रारीद्वारे सांगितले त्यावर कृषी संचालक पुणे यांनी संबंधित कंपनी विरोधात तसेच लेबल क्लेम नसणाऱ्या इतर कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील कृषी विभाग व प्रशासनातील बडे अधिकारी गुंतून असुन हा सर्व गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मुकूटबन, पाटण, पुसद, घाटंजी, पांढरकवडा या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर लाभदायी असल्याचे दिशाभूल करुन संबंधीत कंपनीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येते सदर कंपनीला केंद्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची बायोपेस्टीसाईड विकण्याची परवानगी नसुन केंद्र शासन अशा कोणत्याच बायोपेस्टीसाईड उत्पादनाला परवानगीच देत नाही. तर सदर विक्री राजरोसपणे कशीकाय होऊ शकते. या विषयाला वाचा फोडण्यासाठी मनसेचे हे शिष्टमंडळ जिल्हा मनसेचे नेते अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना भेटले .विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नंदुरबार व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ज्या ठिकाणी भ्रष्ट कृषी अधिकारी व प्रशासनातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठाणारे अधिकारी आहेत त्या ठिकाणी बायोपेस्टीसाईडची विक्री राजरोसपणे सुरु आहे. सदर कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे एका हंगामात २० कोटीचे बायोपेस्टीसाईड विक्री करते. याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास अनधिकृत २०० कंपण्या लेबल क्लेम नसतांना बायोपेस्टीसाईडची विक्री करते. यवतमाळ जिल्ह्यात सेन्सेशनल अॅग्रो सह जवळपास २५ ते ३० कंपण्या अनधिकृतपणे बायोपेस्टीसाईडची विक्री करते. या बायोपेस्टीसाईड मुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका असुन यावर लेबल क्लेम मुळे यामधील समाविष्ट घटक हे कोणत्या उत्पादनासाठी वापरल्या जातात या संदर्भात कोणत्याच प्रकारची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. परीणामी अत्यंत घातक असे रसायन मिसळून सदर बायोपेस्टीसाईडची निर्मिती केल्या जाते. यामध्ये संबंधीत कृषीकेंद्र चालक व संबंधीत डीलरला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा असल्यामुळे तेसुध्दा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात. या सर्व विषयाची माहिती अनिल हमदापुरे यांनी कृषिमंत्री ,कृषी सचिव ,कृषी आयुक्तांना दिली.
हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादाय असुन कृषी विभाग यावर हेतूपुरस्सरपणे डोळेझाक करत असुन शेतकऱ्यांच्या जीवाची कवडीमोल किंमत शासनाच्या लेखी असल्याचे निदर्शनाते येते. संबंधीत सेन्सेशनल अग्री इन्पुटस् प्रा.लि.. हैद्राबाद या कंपनीच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन या सर्व भ्रष्ट कारभारास जबाबदार दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात सुध्दा शेतकऱ्यांच्या जीवीताशी खेळल्यामुळे त्यांचे सुद्धा या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली . कृषी आयुक्तांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा व भ्रष्ट कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी केली.
Add Comment