यवतमाळ सामाजिक

श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 निमित्त आशा/ए.एन.एम./अंगणवाडी कार्यकर्त्यांचे यवतमाळ येथे स्वागत.

श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 निमित्त आशा/ए.एन.एम./अंगणवाडी कार्यकर्त्यांचे यवतमाळ येथे स्वागत.

3 मार्च रोजी महावीर विद्या मंदिर, वाघापूर, यवतमाळ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 निमित्त आशा/ए.एन.एम./अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पोलिओचे डोस पाच वर्षापर्यंतच्या मुलांना दिले.

यामध्ये डॉ. वैष्णवी जयस्वाल, संगीता बोरकुंवार (जी.एन.एम. स्टाफ नर्स), ललिता हातमोडे (आशा सुपरवायझर), साक्षी कांबळे (नर्सिंग स्टाफ), मंगला सरदार (आशा वर्कर)

यांनी वाघापूर परिसरात फिरून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 बद्दल सांगितले तसेच भारत पोलिओ मुक्त आहे. परंतु काही देशांमध्ये पोलिओ अजूनही असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो. आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करून घ्या. पोलिओचा डोस प्रत्येक वेळी द्या. पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करा असे सांगून जनतेस जागृत करून पोलिओचे डोस दिले.

या अशा बहुमूल्य कामगिरीबद्दल श्रावणी बहुउद्देशीय संस्था तर्फे सहसचिव रुपेश नगरनाईक व इतर सदस्य यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Copyright ©