यवतमाळ शैक्षणिक

उद्योजकता उपक्रमा अंतर्गत रानडे मिल्क फॅक्टरीला भेट

उद्योजकता उपक्रमा अंतर्गत रानडे मिल्क फॅक्टरीला भेट

स्थानिक लो.बा.अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील बी.ए .भाग दोन गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींना संगाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये उद्योगाला भेट देण्याचे नमूद केलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ .दुर्गेश कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रानडे मिल्क फॅक्टरीला भेट देण्यात आली.

भेटीचा प्रमुख उद्देश म्हणजे-नवीन पिढीला उद्योजकतेबद्दल प्रेरणा मिळणे, स्वयंरोजगारा विषयी जागरूकता निर्माण करणे, लेबलिंग, पॅकिंगचे ज्ञान अवगत करणे, ‘कमवा व शिका’ ही संकल्पना निर्माण करणे हा होय. आदरणीय आनंदजी रानडे यांनी विद्यार्थिनींना दुधाची गुणवत्ता तपासणे, दुधाचे पाश्चरायझेशन ,पॅकिंग, लेबलिंग, दुधापासून वेगवेगळे पदार्थ कशा पद्धतीने बनविले जातात. तसेच दुग्ध व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्राची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोनाली सलामे आणि प्रा. डॉ. सरिता देशमुख यांनी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच या उपक्रमाला प्रा.सुवर्णा गादगे, प्रा . डॉ. मनीषा क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©