यवतमाळ सामाजिक

यवतमाळ शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कुचकामी – संभाजी ब्रिगेड

यवतमाळ शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कुचकामी – संभाजी ब्रिगेड

यवतमाळ शहरा मधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता,शहरातील सार्वजनिक स्थळे,व चौकातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करण्यात यावी.या अनुषंगाने आज यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड सरांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.

मागील काही दिवसांपासून यवतमाळ शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून,दररोज गुन्हेगारीच्या घडामोडी घडत आहेत.गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी,रस्तालूट, घरफोड्या,खंडणी,मुलींची छेडछाड,अत्याचार,विनयभंग,एटीएम चोरी या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे.या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी,जस की शहरातील महत्वाचे चौक,बसस्टँड,महाविद्यालये,आध्यत्मिक स्थळे,वाहतूक नियंत्रण कक्ष,राष्ट्रीयीकृत बँका,एटीएम,इत्यादी अशा विविध ठिकाणी बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः बंद पडलेली आहे.तरीही वरील विषय लक्षात घेता बंद पडलेली यांत्रिक सुविधा दुरुस्ती करण्याचे आदेश देऊन,सामान्य नागरिकांच्या जीवित्वाचे,मालमत्तेचे रक्षण करावे अशी विनंती करण्यात आली.दरम्यान मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष उल्हास रणनावरे,सदस्य किशोर चव्हाण,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव सचिन मनवर,प्रा.पंढरी पाठे,प्रद्युम्न जावळेकर,किरण सावंत,निलेश पवार,नितीन काळे,सुरज पाटील,अनिकेत मेश्राम,श्रिजित इंगोले,तसेच मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,विर भगतसिंग विद्यार्थी परिषद,आव्हान संघटना,व मराठा सेवा संघाच्या उद्योजक कक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©