यवतमाळ सामाजिक

यवतमाळ मार्गे अकोला बाजार मार्ग सावळी सदोबा कापेश्र्वर- किनवट बस सुरू करण्याची मागणी

यवतमाळ मार्गे अकोला बाजार मार्ग सावळी सदोबा कापेश्र्वर- किनवट बस सुरू करण्याची मागणी

सावळी सदोबा -आर्णी तालुक्यातील ग्रामीण भाग विदर्भ: मराठवाडा सिमेलगत असल्याने या नव्याने कापेश्र्वर ठिकाणी पुलाचे बांधकाम पूर्ण पणे झाले असून या रस्त्यावर बस सेवा सुरु करण्याची मागणी विदर्भ मराठवाडा च्या जनतेची आहे.पुलाच्या बांधकामाला २वर्षपुर्ण झाले आहे.या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन यांनी बांधकामांचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ अभियंता यांना देण्यात आले आहे असे सांगितले पण यवतमाळ अभियंता यांनी रापम यांना पत्र देऊन सुरळीत बस सेवा सुरु केली जाणार असल्याचे समजते पण बा़ंधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभकर्णाची झोप लागली आहे असे वाटते.जनते सोयीसुविधा कडे दुर्लक्ष केले जाते आहे.आमदार /खासदार यांना फक्त जनता मते घेण्यासाठी आठवण येते असते सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही.कापेश्र्वर ठिकाण एक तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाल्याने विदर्भ मराठवाडा या भागातील बरेच गांवागांवातील लोकांचे संपर्क येत त्यामुळे बस सेवा सुरु करण्यात आली तर या भागातील लोकांना किनवट नांदेड जिल्ह्याचे संपर्क वाढला जाते या राजप विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून बस सेवा सुरु करण्यात यावे अशी मागणी जनतेची आहे.

Copyright ©