यवतमाळ शैक्षणिक

भारती महाविद्यालय येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न 

भारती महाविद्यालय येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न 

स्थानिक स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी येथे व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा अंतर्गत बी. ए. भाग तीन गृह अर्थशास्त्र या वर्गातील विद्यार्थ्यांनी करिता व्यक्तीमहत्व विकास या विषयावर दिनांक-01-03-24 रोजी कार्य शाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ .एन. ए. पिस्तुलकर उपस्थीत होते. कार्यशलेकरिता लाभलेले प्रमुख वक्ते, प्रा. पांडे उपस्थीत होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिस्तुलकर सर यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना स्त्री म्हणून आपले व्यक्तिमत्व कसे असावे आणि स्त्रीने आपला आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दलचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना चैतन्य , अंतज्ञान,कल्पनाशक्ती, उत्साह, बुद्धिमत्ता तसेच आपण बोलत असताना चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार, शब्दावरील जोर या सर्व बाबी व्यक्तिमत्वातील महत्त्वाचे घटक आहे. याप्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कांचन मडावी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.स्वाती मनवर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जवळपास सर्वच विद्यार्थिनींचा सहभाग होता.

Copyright ©