यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र व तेलगंना येथील गोंडी गायकांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम

महाराष्ट्र व तेलगंना येथील गोंडी गायकांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम

क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या १९१ जयंती निमित्त

१२ मार्च ला यवतमाळ मध्ये प्रथमच गोंड राजे क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांचे शिल्प चित्र नगरपालिकेच्या वतीने होत आहे. त्यामुळे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने क्रांतिकारक बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती वाघापूर तयार करुन क्रांतिकारक बाबुराव शेडमाके चौक चौसळा रोड येथे महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील गोंडी गायकांचा सत्कार व बहारदार गोंडी गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.यामध्ये गायक पांडुरंग मसराम, सुरेश वेलादे, विकास कुडमेथे, सुबोध वल्के, रवी सहकाटी, रवी मेश्राम, सीमा खान, प्रवीण वल्का,विजय पेंदोर, योगेश पेंदोर,आनंद सोयाम, नरेश सोयाम, नागोराव पुरके, सुनील मडावी या कलाकारांचा गोंडी गीतांचा सदाबहार कार्यक्रम पाहण्यासाठी समस्त आदिवासी बांधवांनी येण्याचे आव्हान क्रांतिकारक बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती च्या वतीने

नरेश उईके,विनोद मडावी, दिलीप शेडमाके, किशोर उईके, अजय उईके, दिलीपराव मसराम ,सचिन कोवे, गजानन कोटनाके, सुधाकर मसराम, गुलाबराव घाेडाम भारत मडावी यांनी केले आहे. असे प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पुसनाके यांनी कळविले आहेत.

Copyright ©