यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्त्याचा जाहीर सत्कार

सावळी सदोबा येथील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्त्याचा जाहीर सत्कार

सावळी सदोबा आर्णी तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोबा येथील आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती च्या वतीने नागपूर येथे आमरण उपोषण करणाऱ्या उपोषण योद्धा सचिन चचाणें यवतमाळ किशोर चौधरी वर्धा चंदन कोहरे बुलढाणा यांनी 26 जानेवारी 2024 पासून जमातीच्या साठी आमरण उपोषण केले होते व 17 दिवस उपोषण चालले करिता ह्या समाज योद्धांचं आर्णी तालुकाच्या वतीने साई मंगल कार्यालय सावळी सदोबा येथे दिनांक 4 मार्च 2024 रोज सोमवारी 11,00 वाजता या भव्य सत्कार समारंभ व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या पुढच्या चळवळीची दशा व दिशा काय हे समजून घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास राउत नागपुर, उद्घाटक,शहीद परिवार बोरगाव,कापेश्वर

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मनोर शहारे कैलास राऊत रामदास नेवारे रुपेश चामलाटे पूर्णा नेवारे गजानन कोहळे सुदर्शन चामलोट अरुणाताई चचाणें सविता ताई नेवारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आयोजक राजेश नागोसे , मोहन ठाकरे पिंटु बोटरे निलेश गजबे , राम गजबे विरु भाऊ नागोसे सचीन नेवारे,अशोक बोटरे अमोल मुरखे व समस्तआदिवासी गोंड गोवारी समाज आर्णी तालुका च्या वतीने कळविण्यात आले

Copyright ©