यवतमाळ सामाजिक

राज्यस्तरीय कराटे  स्पर्धेसाठी यवतमाळातील तीन विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय कराटे  स्पर्धेसाठी यवतमाळातील तीन विद्यार्थ्यांची निवड

कराटे डो असोसिएशन यवतमाळ या संघटनेच्या वतीने शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ मध्ये दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ जिल्हा कॅडेट, ज्युनिअर, अंडरट्वेंटीवन व सीनिअर कराटे स्पर्धा व निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगाटात कुमीते व काता इवेंट मध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व त्या मध्ये श्रवण निकेश कडूकार ( जूनियर – 55 ) यश कृशब दरवेकर ( अंडरट्वेंटीवन -50 ) हितेश रविंद्र महानूर (सीनियर – 55) यांनी आपला सहभाग नोंदविला व घवघवीत यश मिळवत राज्यस्तरीय कराटे स्पर्धे साठी पात्र ठरले हे खेळाडूंनी होणार्‍या कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कॅडेट, ज्युनिअर, अंडरट्वेंटीवन व सीनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि. 2 व 3 मार्च रोजी 2024 रोजी शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई स्पर्धा करीता निश्चित केले. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, विनोद खोडकुंबे, अजित मिश्रा, हेमंत उइके, अश्विनी उईके, हितेश महानुर व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ), रविन्द्र महानुर, व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©