यवतमाळ राजकीय

पंतप्रधानांच्या सभास्थळी जाणारा शिवसेनेचा मार्च पोलिसांनी रस्त्यातच अडविला

पंतप्रधानांच्या सभास्थळी जाणारा शिवसेनेचा मार्च पोलिसांनी रस्त्यातच अडविला

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेला आहे भाजपच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या योजनांचे थोतांड मांडले गेले, शेतकऱ्यांच्या कापसाला, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मीळतो आहे, आणि हे सरकार फसव्या जाहिराती करत आहे याचा निषेध म्हणून आज पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या व्यथा कळल्या पाहिजे म्हणून शेतकऱ्याच्या प्रतीकात्मक अस्थिकलश त्यांना देण्याकरिता आज सभास्थळी निघालेल्या शिवसेना (उद्धव साहेब ठाकरे)चे, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, उपतालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख चेतन शिरसाठ, महिला आघाडी संघटिका कल्पनाताई दरवई, तालुका संघटिका अंजलीताई गिरी, प्रतिभा हरणखेडे महीला आघाडी शहरप्रमूख,उप तालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे, जितेश नावडे, राजेंद्र कोहरे उपशहर प्रमुख,राजू गिरी,शितेश ठाकरे, सचिन बारस्कर, चेतन जगताप , बिल्ला सोळंकी, संतोष चव्हाण, संजय मोहोड, प्रमोद भारती, योगेश गणवीर, यांना यावेळी सभास्थळी जाण्यापासून पोलिसबळाचा वापर करून रोखण्यात आले.

Copyright ©