यवतमाळ राजकीय

भा.ज.पा. च्या तालुका सह सचिव पदी सुरेश पवार यांची निवड

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

भा.ज.पा. च्या तालुका सह सचिव पदी सुरेश पवार यांची निवड

सावळी सदोबा.. सुभाष नगर येथील सामाजिक कार्यकर्ता सुरेश पवार यांची भाजपा आर्णी तालुका सहसचिव पदी निवड करण्यात आली ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर आपल्या चांगल्या कार्यशैलीमुळे परिचित लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर निस्वार्थ पणे काम करणाऱ्या या मधून एक व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश पवार नुकत्याच आर्णी येथील विश्राम गृहामध्ये भाजपाचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष किसन राठोड यांनी पक्षाची नवीन कार्यकारणी गठीत केली या कार्यकारणीत तालुक्यामधील सर्कल निहाय उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष बूथ प्रमुख यांची निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष किसन राठोड यांनी सुरेश पवार यांना तालुका सहसचिव पदी नियुक्ती पत्र दिले यावेळी उपस्थित माजी.जी. प. सदस्य प्रकाश भाऊ राठोड तालुका उपाध्यक्ष सुरेश पवार शहराध्यक्ष विशाल देशमुख राजू राऊत गोवर्धन राठोड राहुल सोयाम बच्चेवार हे पदाधिकारी उपस्थित होते

Copyright ©