यवतमाळ सामाजिक

प्रभू विश्वकर्मा जयंती व सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

प्रभू विश्वकर्मा जयंती व सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

विश्वकर्मामय विकास मंडळ वडगाव रोड यवतमाळ च्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा जयंती व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.सर्व प्रथम विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता १०वी व १२वी मधिल एकुण २० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसनराव राऊत गुरुजी,तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ता सुर्यवंशी, खुशालराव लाठेकर, प्रभाकर तरोळकर, विठ्ठलराव चांदुरकर, राजेश रोडेकर, कैलाश गव्हाणकर, संजय ईश्वरकर व मुरलीधर हरणे होते.

विश्वकर्मामय विकास मंडळ वडगाव चे अध्यक्ष कैलाश गव्हाणकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी समाजाने एकत्र येऊन समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे आव्हान केले.सुतार समाजाचे २०२४ चे कॅलेंडर मंडळाने काढले, मंडळ भविष्यात सामुहिक विवाह आयोजित करेल, प्रभू विश्वकर्मा मंदिर बांधेल त्या साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.राउत गुरुजी, प्रभाकर तरोळकर व दत्ता सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपण कसा अभ्यास करावा?, भविष्यात काय आव्हाने असतील याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.मंडळातील सर्व सदस्यांनी कार्यक्रम उत्तम होण्यासाठी प्रयत्न केले.शेवटी आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव बंडु ईश्वरकर यांनी केले.यावेळी समाजातील शेकडो बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

Copyright ©