यवतमाळ सामाजिक

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा वृक्षारोपण व पदभार समारंभ

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा वृक्षारोपण व पदभार समारंभ

यवतमाळ जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन व विकास समिती वाढीस यावी म्हणून व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने जिल्हा कार्यकारणी कडून समाज सेवेची आवड असलेल्या व करत असलेल्या कार्यात अधिक भर पडावी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील तालुका राळेगाव येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल, जिल्हासचिव प्रकाश खुडसंगे व कार्याध्यक्ष मनोहर बोभाटे यांच्या हस्ते राळेगाव तालुक्यातील समाज कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींना पदभार देण्यात आला त्या मध्ये संदीप तेलंगे जिल्हाउपाध्यक्ष, डॉ. कुणाल भोयर जिल्हाउपाध्यक्ष, निखील काकडे जिल्हासरचिटणीस, पद्माकर राऊत राळेगाव तालुकाउपाध्यक्ष, अरुण शिवणकर राळेगाव शहरउपाध्यक्ष याना समिती वरील प्रमाणे पदभार देऊन गौरव करण्यात आला,

त्याच बरोबर राळेगाव येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा असलेल्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून काही फळ झाडे व शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली व नवनिर्वाचित सदस्यांन कडून शिवतीर्थ परिसर व सुशोभीकरण करण्यास मदत करतील व शहरातील खुल्या मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जाईल तसेच शहरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्न करणे याची ग्वाही घेण्यात आली.

Copyright ©