यवतमाळ शैक्षणिक

स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांची अकोला करिता निवड

स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांची अकोला करिता निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य अंतर्गत यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व यवतमाळ जिल्हा म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन यांच्या सयुक्त विध्यमानाने जिल्हास्तरीय शालेय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा दिंनाक २२ फ्रेबुवारी २०२४ रोजी जिल्हा क्रिडा संकुल गोधनी रोड येथे संपन्न झाली या स्पर्धा मध्ये जवळ पास ७ ते ८ शाळेचा समावेश होता ही स्पर्धा 19 वर्षाआतील मुलं व मुलींन मध्ये पार पडली . तसेच या विनादेवी दर्डा स्कुल च्या ४ मुले व १ मुलीचा समावेश होता त्या मध्ये मन महेश चव्हाण 35 – 38 वजन , राजित विनोद देशमुख 44 – 47 , राज सुनिल जैस्वाल 62 – 66, मोश्र राजित राठोड 82 व भक्ती दर्शन कोषटवार 41 – 44 वजन यांची निवड अकोला येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धा करिता निवड झाली .

त्यांच्या यशाचे श्रेय स्केटिंग प्रशिक्षक प्रविण दिघाडे व क्रिडा शिक्षक राधिका जैस्वाल , गौरव निबुळकर यांना देतात . तर त्यांचे कौतुक शाळेच्या प्राचार्य श्रीमती अनिता रासकर तसेच क्रिडा अधिकारी घनशाम राठोड यांनी केले .

Copyright ©