यवतमाळ राजकीय

हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतनिमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत नोटबुकचे वाटप

हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतनिमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत नोटबुकचे वाटप

अकोला बाजार : वंदनीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त व संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत अकोलाबाजार परिसरातील मंजार्डा, कामाठवडा, खैरगाव तांडा, अकोलाबाजार येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शालेय नोटबुक यांचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ विधानसभा यांच्यातर्फे वितरण करण्यात आले.

या वेळी शाळेतील उपस्थित विध्यार्थी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी संवाद साधत बोलते केले. उपस्थित विद्यार्थी यांना आपण भविष्यात काय होणार असे विचारले तेव्हा बहुसंख्य चिमुकल्यांनी पोलिस असे सांगितले, कदाचित त्यांना यवतमाळ घडणारी गुन्हेगारी संपुष्टात आणयची असेल असे संतोष ढवळे म्हणाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र म्हणुन शालेय परिसर दणाणून सोडला.

या शालेय नोटबुक वाटप प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, बाजार समिती उपसभापती व उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, उपतालुकप्रमुख गजानन पाटील, बाजार समिती संचालक संजय राठोड, विभागप्रमुख गणेश आगरे व गणेश आगलावे, शाखाप्रमुख श्रावण वाघाडे, अक्षय ठाकरे, लक्ष्मण ठाकरे, उपसरपंच दिनेश चव्हाण, दिनकर भवरे, सिद्धू वाघमारे, संजय मोहोड, ज्ञानेश्वर जाधव, पूर्शोत्तंम आडे, सुरेश जाधव देवानंद सपाट, फकिरा महाराज आदी उपस्थित होते.

Copyright ©