भारती महाविद्यालय येथे शुष्क पुष्परचना कार्यशाळा संपन्न
स्थानिक स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य आणि श्रीमती सुशिलाबई रा. भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी, जिल्हा यवतमाळ येथे शुष्क पुष्परचना कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. ए .पिस्तूलकर उपस्थीत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.एस. व्ही.वानखेडे उपस्थित होते. पुष्परचना कार्यशाळेचे प्रशिक्षण देण्याकरिता महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.निकिता कदम उपस्थित होती. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निकिती कदम हिने विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना शिकविल्या. सिल्वर तार, गोल्डन तार, घोटीव पेपर, टिशू पेपर, वेगवेगळ्या रंगाचे पराग, सॉक्स कापड, खराट्याच्या काड्या इत्यादी साहित्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक बुके बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थिनिंना देण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. ए . पिस्तुलकर यांनी
अध्यक्षीय भाषणामध्ये आजच्या काळामध्ये स्वयंम रोजगाराच्या प्रेरणेतून छोटा व्यवसाय सुरू करून जास्तीस जास्त उत्पन्न मिळविता येणे गरजेचे आहे. बाजारातील मागणी व गरजा लक्षात घेऊन तसेच बाजारातील वस्तू व सेवांची संधी लक्षात घेऊन स्वतःचा व्यवसाय सर्व विद्यार्थिनींना करता आला पाहिजे अशाप्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ . एस.व्ही.वानखेडे यांनी स्वयंरोजगारासाठी विविध पातळीवर बाजारपेठा उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच स्वयंरोजगार निर्मितीसाठी शासनात विविध योजना लागू केलेल्या आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला वस्तूबरोबर सेवांची आवश्यकता असते. अशा पूर्तता केल्यास स्वयंमरोजगार निर्माण होऊ शकतो. याप्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पुनम रौराळे हिने केले. तर आभार प्रदर्शन कु. शितल उईके हिने केले. कार्यशाळे करिता जवळपास सर्वच विद्यार्थिनींचा सहभाग होता. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता प्रा. कांचन मडावी, प्रा. स्वाती मनवर, प्रा. डॉ. मनिषा क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
Add Comment