यवतमाळ राजकीय

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत यादव पाटील

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत यादव पाटील

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत यादव पाटील यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी भाजप यवतमाळ शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

भाजप नेते आमदार मदन येरावार यांच्या मार्गर्शनाखाली जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांच्या स्वाक्षरीने प्रशांत यादव पाटील यांच्या नेमणुकीचे पत्र नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय जिल्हा महामंत्री रेखाताई कोठेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्याम जयसवाल, मायाताई शेरे, नितीन भुतडा, अजय खोंड, चिंतामण पायघन, प्रमोद गांडूळे पाटील,आकाश धुरट , यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांसह कट्टा ग्रुप तसेच शहर पदाधिकाऱ्यांना देत आहे. यापुढे सुधा पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिक आणि चोखपणे करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Copyright ©