यवतमाळ सामाजिक

अकोला बाजार येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती कार्यक्रम

अकोला बाजार येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती कार्यक्रम

अकोला बाजार :- संत सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या निमित्त गोर बंजारा उत्सव समिती अकोला बाजार सर्कल अकोला बाजार, बारड तांडा, मांजर्डा, खैरगांव, कामठवाडा आदी गावाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बंजारा समाज बांधवांचा असलेला पारंपरिक लेहंगी नृत्य महोत्सव होणार असून 10 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, स्पर्धा परीक्षा अनुषंगाने घेतलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

15फेब्रुवारी रोजी सकाळी जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भव्य मिरवणूक सोबत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. शेवटी पूजाअर्चा करून कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोर बंजारा उत्सव समिती अकोला बाजार सर्कलच्या वतीने चंदू पवार,रोशन जाधव,ज्ञानेश्वर जाधव, सुरज जाधव ,चेतन पवार, कुलदीप पवार ,हेमंत राठोड पुरुषोत्तम आडे , करन जाधव यांनी केले आहे.

Copyright ©