यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषदेवर आयटक अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेवर आयटक अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे धरणे आंदोलन

( मानधनत वाढ करण्याची मागणी )

यवतमाळ :- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा रुपये २६०००/- मानधन / वेतन द्या व आरोग्य खात्यात कायम करा या मुख्य मागणीला घेऊन जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयावर धरणे आंदोलन केले , प्रलंबित मागण्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यवतमाळ यांचे मार्फत मा.ना.एखनाथजी शिंदे,मुख्यमंत्री , मा.तानाजी सांवत आरोग्य मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, दि.२० ऑगस्ट२०१४ रोजी मा.आरोग्य संचालक मुंबई यांनी अंशकालीन स्त्री-परिचरांना रू.१०,०००/- वेतन वाढ देण्यात यावी अशी शिफारस केली आहे.मात्र सरकार या कडे दुर्लक्ष केरीत आहे असे संघटनेने म्हटले आहे अलीकडे सुध्दा सहा हजार रुपये मानधन वाढ द्या म्हणून आरोग्य खात्याने प्रस्ताव टाकला आहे त्याची शासनाने अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने केली आहे .मागण्या अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा रू.२६०००/- मानधन/वेतन द्या, त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करा, त्यांना पुर्णवेळ कर्मचारी करा, वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा, गणवेश व ओळख पत्र तातडीने द्या यासह‌ इतरही मागण्या करण्यात आल्या यावेळी

कॉ.दिवाकर नागपुरे,मंगला लंबे, वैशाली निबर्ते , जिजा रीगने,कल्पना सवाईमुन, आशा बोबडे , सोनाली कडुकार , शेवंता पवार, रमा शंभरकर , मिरा वाघमारे ,उषा राठोड, बेबी ठाकरे ,वंदना माडगूळकर, अनुसया सोनकुसरे, संगिता वायदंडे, सुमित्रा जमदाळे , शशीकला भगत ,अर्चना चिकटे, गंगू तोङसाम , सुनीता भस्मे. जयश्री मरापे, पर्वता दाते , वेनु काबले , रंजना ढोके ,धोङाबाई आगोशे , सायराबी मुसा शेख, कविता राठोड ,अंजना सरकुडे ,मिना ठाकरे ,जमना गंगावली, विद्या गिरोलकर, संगिता राठोड, कुसुम जोगदंडे, वंदना मागुळकर, छाया पडघाने, नंदा कांबळे, संगिता जाधव, वनिता मिराशे ,कमल कांबळे ,आशा बोबडे ,सप्ताफुले , कांबळे गिता कुडमते , संगिता पिस्तूलकर ,हंसमाला शेंडे, प्रतिभा सुकळकर सोनाली कुरडकार, वर्षा पीसे,वंजेमाला राठोड, संगीता वायदंडे,कमल मेंडके,या सह शेकडो महिला उपस्थित होत्या

Copyright ©