यवतमाळ सामाजिक

‘ व्हॅलेंटाईन डे ‘ वर बहिष्कार घालण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार ! 

‘ व्हॅलेंटाईन डे ‘ वर बहिष्कार घालण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार ! 

हिंदू जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !

यवतमाळ, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही पश्चिमात्य देशांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे, प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या विकृत संकल्पनेमुळे शालेय युवा पिढी भोगवाद अन अनैतिकेकडे जात आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोर क्रांतिकारक यांच्या या देशांमध्ये पाश्चात्य कुप्रथाना स्थान नाही, त्यामुळे 14 फेब्रुवारीला असणाऱ्या व्हॅलेंटाईन डे वर आम्ही बहिष्कार घालू असे आवाहन श्रीमती सुमित्राबाई ठाकरे आयुर्वेदिक महाविद्यालयातिल विद्यार्थ्यांनी केले, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान संस्कृती रक्षण मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील दर्डा इंजीनियरिंग कॉलेज, देशमुख नर्सिंग कॉलेज, शिवाजी विद्यालय, विद्याभारती विद्यालय, नंदुरकर विद्यालय, समर्पण विद्या अकॅडमी यासह वनी, दिग्रस, आर्णी, कारंजा येथील पोलीस, प्रशासन तसेच विविध महाविद्यालयांत भेटी देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना हस्तपत्रक देऊन प्रबोधन करण्यात आले.

या मोहिमेमध्ये हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश खांदेल, विजय जाधव, दत्तात्रय फोकमारे, विवेक पांडे, बंटी चव्हाण,लोभेश्वर टोंगे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री देऊळकर सहभागी होते.

Copyright ©