यवतमाळ शैक्षणिक

यवतमाळचा खेळाडूंचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

शोतोकान कराटे डो असोसिएशन,

यवतमाळचा खेळाडूंचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

वॉरियर स्पोर्ट्स अँड मार्शलआर्ट अकॅडमी अमरावती तर्फे आयोजित महाराष्ट्र ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, उत्तम नगर, अमरावती येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडू यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून पदके पटकावली त्यात काता या प्रकरात जन्मजय उमेश इंगोले, कु. सृष्टी स. रेकवार, व चंदन राऊत यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच, कु. वेदांती चावले, स्वरीत खंडारे व देवानंद राठोड यांनी रौप्य पदक तसेच हिमांशू साठे यांनी कांस्य पदक मिळविले.

तसेच कुमीते प्रकरात स्वरीत खंडारे, प्रथमेश काकडे, कु. अदिती ईसाळकर, वेदांती चावले, चंदन राऊत व कु. नव्या पेठे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच तसेच ओमसिंग चव्हाण यांनी रौप्य पदक तसेच हिताशं रेकवार व युवान जैसवाल यांनी कांस्य पदक मिळविले. यांनी कास्य पदक प्राप्त केले. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतील असुन हे विद्यार्थी शंकरलाल कोठारी विद्यामंदिर समर्थवाडी यवतमाळ येथे प्रशिक्षण घेतात. या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक सेंसाई रोहित केवारकर, सेंसाई अजित मिश्रा, सेंसाई विनोद खोडकुंबे, सेंसाई हेमंत उईके सेंसाई हितेश महानुर,सेंसाई यश दरवेकर व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े, अश्विनी उईके, रविन्द्र महानुर व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©