यवतमाळ शैक्षणिक

आदर्श महाविद्यालय यते निरोप समारंभ संपन्न

आदर्श महाविद्यालय यते निरोप समारंभ संपन्न

स्थानिक आदर्श शिक्षण महाविद्यालय येथे निरोप समारंभ सोहळा संप्पण झाला.प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या भोयर प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय वसीम सर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श कनिष्ठ महविद्यालया च्या प्राचार्य शाहीन मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला . डॉ.भोयर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व्यक्त केले. तर माननीय वसीम यांनी मॅडमनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि यापुढे पण आम्हाला आपले सहकार्य अपेक्षित आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निता राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. मनीषा क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. दिपाली पारधी यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©