यवतमाळ सामाजिक

अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात

अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात

विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार !

नांदेड येथे येत्या १० मार्च २०२४ रोजी आयोजित सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रस्ताव देशभरातून मागविण्यात आले आहेत.

१) राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले प्रेरणा पुरस्कार, २) वीर कक्कया राष्ट्रप्रेम पुरस्कार, ३) संत हरळय्या जाती निर्मूलन पुरस्कार, ४) राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज प्रबोधन पुरस्कार, ५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार, ६) मान्यवर कांशीरामजी सामाजिक कार्य पुरस्कार, ७) बिरसा मुंडा युवक प्रेरणा पुरस्कार, ८) गुरु रविदास साहित्य प्रेरणा पुरस्कार, ९) संत सेवालाल धार्मिक कार्य पुरस्कार, १०) लहुजी साळवे शौर्य पुरस्कार, ११) मुक्ता साळवे बाल लेखन गौरव पुरस्कार, १२) माता लोणाई अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार, १३) बहन मायावती राजकीय गौरव पुरस्कार, १४) राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार, १५) डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान पुरस्कार, १६) गुरु नानक समता पुरस्कार, १७) दलितमित्र गंगाधरराव देगलूरकर जीवन गौरव पुरस्कार, १८) संत तुकाराम काव्य पुरस्कार, १८) साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे कादंबरी पुरस्कार, १९) महात्मा बसवण्णा वैचारिक लेखन पुरस्कार आणि २०) वामनदादा कर्डक गायन पुरस्कार.

या विविध पुरस्कारांसाठी संबंधित व्यक्तींनी योग्य त्या पुराव्यांसह परिपूर्ण प्रस्ताव रजिस्टर्ड पोस्टाने लवकरात लवकर इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, गंगानगर, सांगवी बु. नांदेड – ४३१६०५ (मो. ८५५४९९५३२०) या पत्त्यावर पुरेशा पोस्टेज व रंगीन फोटोंसह पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. लेखकांनी पुस्तकांच्या प्रत्येकी तीन प्रती पाठविणे आवश्यक आहे.

Copyright ©