यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची त्वरित हकालपट्टी करा

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची त्वरित हकालपट्टी करा

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत किन्ही येथील जिल्हा परिषद शांळेच्या शिक्षिकेची वाढती मनमानी कारभाराने पालक शिक्षक मुख्याध्यापक व पालक समिती सुद्धा त्रस्त झाल्याने वीणा पवार ह्या मागील पाच वर्षांपासून एकसुत्री कारभार चालवत आहे कुणालाही न जुमानता नको ते उपदव्याप करीत आहे

किन्ही येथील सहाय्यक शिक्षिका विणा पवार यांनी चक्क शाळा व्यवस्थापन समिती सोबत वादच घातला

यवतमाळ जवळच आर्णी रोड वर स्थित असलेल्या किन्ही येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे मध्ये सहाय्यक शिक्षिका वीणा पवार यांनी गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सोबत तर सोडाच पालकांन सोबतही उद्धट वागणूक देतात कुणाचा आदर तर करतच नाही मग विद्यार्थ्यांवर काय सस्कार देणार,कसे विद्यार्थी घडणार त्यांचे भविष्य कसे होणार या चिंतेने समितीने व ग्रामस्थांनी या शिक्षिकेची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे.

ह्या पवार शाळेत वेळेवर कधीच येत नाही. विद्यार्थ्यांना शिकवत तर नाहीच,त्यांचे सोबतही चांगले व्यावहार आहे करीत नाही तर शाळेच्या मुख्याध्यापक, इतर शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सोबत सुद्धा त्यांनी अनेक वेळा वाद घातले

कारणाने शाळा व्य. स. चे अध्यक्ष अरुण देवकर व उपाध्यक्ष सौ. सुमैय्या मोबीन शेख यांच्या तक्रारीवरून स. शि. वीणा पवार यांच्या बदली चा ठराव ग्रामपंचायत किन्ही येथे बहुमताने पास करण्यात आला असून वीणा पवार यांच्या बदली संदर्भात तक्रार पंचायत समिती यवतमाळ व जिल्हा परिषद यवतमाळ येथे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली आहे व बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा शाळा व्यवस्थापन दिला आहे.

Copyright ©