यवतमाळ सामाजिक

कमांडो गौतम धवने यांना राळेगण सिद्धी येथे सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मानीत.

कमांडो गौतम धवने यांना राळेगण सिद्धी येथे सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मानीत.

माहिती अधिकार नागरिक समूहाचे दुसरे महाअधिवेशन राळेगण सिद्धी येथे संपन्न

यवतमाळ

ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिकांचे दुसरे महाअधिवेशन २८जानेवारी २०२४ रोजी राळेगणसिद्धी पारनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोठ्या उत्साहाने मार्गदर्शन केले.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील कोबरा कमांडो गौतम धवणे यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ज्ञानमाता माहीती अधिकार प्रशिक्षण केंद्र पूणे यांनी सन्मानचिन्ह देऊन राळेगण सिद्धी येथे सन्मानीत केले.जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते सुध्दा त्यांचा सत्कार करण्यात आला.यवतमाळ जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत शेतकरी,गरीब मजूर वर्ग व विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा काम कमांडो गौतम धवणे यांनी केले आहे.

माहिती अधिकार कायदा जुना होत नसून कायदा जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रचार प्रसार केला पाहिजे तसेच लोकायुक्त कायदा आपण शिकून घेतला पाहिजे.आणि लोकायुक्त कायद्याचा वापर करून भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण घरी बसवले पाहिजे असे मार्गदर्शन करताना समाजसेवक अण्णा हजारे साहेब यांनी सांगितले.या अधिवेशनासाठी जळगाव वरून दीपक कुमार गुप्ता ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या अधिवेशनासाठी संजय पठाडे यांनी माहिती अधिकार नागरिकांना मार्गदर्शन केले.

संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी या अधिवेशनात माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की माहिती अधिकार कायद्याचा आपण वापर केला पाहिजे देशात ६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजा ही राजा आहे आणि प्रजेची सत्ता आलेली आहे या प्रजेने जागरूक होऊन शासनाला जाब विचारावा व सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करावा आणि माहिती अधिकार कायद्याचा वापर करून खरोखर माहितीचा अधिकार घरा घरात पोहोचवावा.

यावेळी ज्ञानमाता सेवाभावी संस्था पुणे चे संस्थापक अध्यक्ष आब्राहम आढाव,खंडूअण्णा गव्हाणे, अर्जुन आसने, दीपक पाचपुते, सारीका पवार, सचिन नरोटे,सागर इसवे, राजाभाऊ पवार, बाळकडू वृत्तपत्राचे संपादक दिपक खरात,शशिकला थोरात,श्वेता रायकर,अमित कांबळे ,जालाज नीवस्कर तसेच यवतमाळ येथून कोबरा कमांडो गौतम धवणे,शरीफ शेख,सैय्यद शोएब,किशोर भगत आदी उपस्थित होते.

Copyright ©