Breaking News यवतमाळ

वारजई च्या उपसरपंचां सह तीन सदस्यांचा राजीनामा

वारजई च्या उपसरपंचां सह तीन सदस्यांचा राजीनामा

वारजई व जामवाडी गट ग्रामपंचायत असून या ठिकाणी सरपंच यांच्या मनमानी कारभारानी कळसच गाठला असल्याने येथील सरपंच सचीवास हातात धरून आपली मनमानी करीत असल्याने विकासाला पुर्णतः खीळ लागली आहे वारजई येथील गट ग्रामपंचायत जामवाडी येथील वार्ड क्रमांक दोन व तीन करिता आज पर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात आला नसल्याने या वार्डातील एकही विकास कामे आत्तापर्यंत झालेली नाही सरपंच यांची मोठ्या प्रमाणात मनमानी असून कुणालाही विश्वासात न घेता आपली मनमानी पद्धत सुरू असून स्वतः च्या मर्जीने कामे करीत आहे ज्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकासच नाही सन 2021 ला येथील सत्ता स्थापन झाल्यापासून सरपंच यांनी उपसरपंच व सदस्यांना कोणत्याही कामात सभा असो अथवा ग्रामसभा यात विश्वासात कधीच घेतले नाही सरपंच यांच्या मनमानीने सदस्य ग्रामस्थ ही त्रस्त झाली आहे येथील विकास कामाचा उडालेला संपूर्ण बोजवारा जनतेला तारेल का?तसेच विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायत सण 2021 ला सत्ता स्थापन झाल्यापासून तीन वर्षाच्या कालावधीत सरपंच यांनी जनतेतून आजपर्यंत एकही ग्रामसभा घेतली नाही किंवा ग्रामसभा घेण्याकरिता कधीही प्रयत्न केलेला नाही त्यामुळे कामाबाबत झालेले सर्व ठराव ग्रामसभेचे नसून फक्त सरपंच यांनी स्वतःच्याच मर्जीने घेतलेले ठराव आहे ग्रामपंचायत कार्यालयात गावातील सुरू असलेल्या कामात सरपंच हे स्वतः कधीच हजर राहत नाही तर सरपंच यांचे पतीच सर्व व्यवहार सांभाळतात कार्यालयात फक्त दररोज त्यांचे पती हजर असतात त्यामुळे महिलांच्या व जनतेच्या समस्या सांगायच्या तर कुणाला सरपंच यांचे पती मोठ्या प्रमाणात मनमानी करत असल्याने कोणी विचारलेल्या प्रश्नाला उद्धटपणे उत्तर देण्याची प्रथा सरपंच यांनी चालवली आहे व कोणी प्रयत्न केल्यास त्याला दम दिला जातो अशा अनेक प्रसंगाला तोंड ग्रामस्थ व सदस्यांना द्यावे लागत आहे सरपंच यांच्या मनमानी कारभारणी त्रस्त होऊन येथील उपसरपंच संवेद सदस्यांनी सचिव यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे यामध्ये लखन अजबराव अवथळे वंदना रामभाऊ पारधी अनिता श्रावण पाने व मारुती चिंचकर यांनी सामूहिक राजीनामा येथील ग्रामसेवक यांच्या सुपूर्त केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे येथील सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना या ठिकाणी घडली आहे अशाच प्रकारचे मनमानी कारभार कुठपर्यंत चालणार देशात लोकशाही नांदते की हुकूमशाही असाही प्रश्न सदस्यांनी केला आहे याची जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित पदाधिकारी सरपंच व सचिव यांचे वर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही उपसरपंच तथा सदस्यांनी केली आहे

Copyright ©