यवतमाळ सामाजिक

संत सेवालाल जयंती निमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ हरीनाम सप्ताहचे आयोजन

संत सेवालाल जयंती निमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ हरीनाम सप्ताहचे आयोजन

जगदंबामाता महिला योगा ग्रुपचा पुढाकार

पुसद शहरातील इटावा वार्ड येथे माँ जगदंबा मंदिरात यावर्षी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने 0८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संगीतमय श्रीमद भागवत कथा व हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरवात भागवताचार्य श्री. ह.भ.प.

प्रवीण महाराज सातपुते ( शाश्त्री ) यांच्या मधुर वानीतुन हा सप्ताह सुरू होणार आहे. यावेळी भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जगदंबामाता महिला योगा ग्रुप व इटावा वार्ड मधील सर्व मान्यवर मंडळी यांनी केले आहे या कार्यक्रमांमध्ये दिनांक ८ फेब्रुवारीरोजी ह.भ.प. शरद महाराज मोरे पुसद, दि. ९ फेब्रुवारी ह.भ.प. डॉ दिनकर बाजड पुसद, दि १० फेब्रुवारी ह.भ.प. गणेश महाराज धर्माळे पुसद, दि ११ फेब्रुवारी ह.भ.प. बबन महाराज चातारीकर, १२ फेब्रुवारी ह.भ.प. परीक्षित महाराज मोरे काळी ( दौ ) 13 फेब्रुवारी ह.भ.प. नंदकुमार खंदारे ( पाटील ) मुडानकर यांचे भजन होणार आहे तर १४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कार्तिक महाराज, व ह.भ.प. अविनाश महाराज यांचा बंजारा भजनाचा कार्यक्रम राहील. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता संत सेवालाल महाराज यांची पालखी मिरवणूक राहिल व प्रवीण महाराज यांचा सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन होईल.त्यानंतर ह.भ.प उल्हास महाराज गायमुख नगर यांचे हस्ते संत सेवालाल महाराज यांचा पाळना आरती होताचं महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

वरील सर्व कार्यक्रमाचे नेतृत्व श्री . ह. भ. प. प्रवीण महाराज सातपुते करीता आहेत. कार्यक्रमाच्या सांगता दिनी सर्व प्रथम इटावा नगरीतुन टाळ मृदंगाच्या आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या जयघोषाने भव्य अशी सुंदर मिरवणुक निघेल मिरवणुकीमध्ये इटावा वार्डसह परीसरातील भजनी मंडळ यांचा सहभाग राहील.

या संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व पारायणाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच तन- मण धनाने सहकार्य करावे असे जगदंबमाता महिला योगा ग्रुप व समस्त गावकरी मंडळी इटावा वार्ड यांनी कळवीले आहे.

Copyright ©